ऐतिहासिक माहिती



नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खान्देश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्‍हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे). नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..